नवी मुंबई, दि. २ : स्वराज्य प्रतिष्ठान रायगडचा माध्यमातून वैद्यकीय शिबिरा च्या अनुषंगाने रक्तदान शिबिरचे नियोजन वाशी जुहूगाव ह्या ठिकाणी करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आगरी कोळी फेम गायक श्री परमेश दादा माळी हे उपस्थित होते स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख श्री संजय पाटील साहेब हे देखील उपस्थित होते त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती सदर शिबिर संघटनेचे संस्थापक श्री भास्कर भाई कारे यांचा मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष श्री सचिन अंबावले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
छत्रपती शिवरायांना अभिवादन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली शिबिरासाठी एमजीएम हॉस्पिटल पनवेल च्या वैद्यकीय टीमचे सहकार्य लाभले शिबिरामध्ये ६० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
स्वराज्य प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात यासारखे आणखी उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येतील असे संस्थापक श्री भास्कर कारे यांनी त्यांच्या मनोगतांमध्ये सांगितले उपस्थित चे आभार मानून शिवगर्जाने शिबिराची सांगता झाली.
