अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या...
राजकारण
नवी दिल्ली, २५ : श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली या समारंभास...
मुंबई, दि. 11 : आपल्या संविधानानुसार, ‘आम्ही भारताचे लोक’ हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा उद्घाटन सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे. राजभवनासह दरबार हॉल देखील लोककल्याणकारी उपक्रमांसाठी एक प्रभावी केंद्र बनेल, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, व इतर मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद म्हणाले, राजभवनात कोणतीही वैयक्तिक किंवा कोणतीही गोपनीय बाब नाही. जे काही घडते ते सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांसोबत, सार्वजनिकपणे पारदर्शकपणे, लोकसेवकांकडून जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याची पद्धत रूढ होत आहे. अशा प्रकारे हे नवे दरबार हॉल नव्या संदर्भातील आपल्या नव्या भारताचे, नव्या महाराष्ट्राचे आणि आपल्या चैतन्यशील लोकशाहीचे नवे प्रतीक आहे. राजभवनाच्या या दरबार हॉलमध्ये मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी मोरारजी देसाई यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता अशी आठवण यावेळी राष्ट्रपतींनी जागविली. भारताचे माजी पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई यांच्याकडे मला त्यांचे स्वीय सचिव म्हणुन काम करण्याची संधी मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र हे नावाप्रमाणेच महान राज्य असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, राज्याच्या महानतेला अनेक परिमाण आहेत. महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांचीच नावे मोजली तरी यादी संपणार नाही. शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक व्यक्तिमत्त्वांमध्ये महाराष्ट्राच्या महानतेचा असा अफाट प्रवाह दिसतो. यापूर्वी अनेकदा महाराष्ट्रात यायची संधी मिळाली, मात्र यावेळच्या प्रवासात मला एक पोकळी जाणवतेय. असे सांगून राष्ट्रपतींनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याविषयी शोकभावना व्यक्त केल्या. त्याच्यासारखी महान प्रतिभावान गायिका शतकात एकदाच जन्माला येतात. लताजींचे संगीत अमर आहे, जे सर्व संगीत प्रेमींना नेहमीच मंत्रमुग्ध करेल. यासोबतच त्यांच्या साधेपणाची आणि सौम्य स्वभावाची आठवणही लोकांच्या मनावर उमटणार आहे. मला व्यक्तिश: त्यांचा स्नेह मिळाला. त्यांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. असे श्री कोविंद म्हणाले. राजभवन हे जनता भवन व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तिन्ही बाजूनी समुद्रानी वेढलेल्या या राजभवनवर बाणगंगेचे, मुंबादेवीचे आणि सिद्धीविनायकाचे आशिर्वाद आहेत. राजभवन हे जनता भवन व्हावे. अशी इच्छा व्यक्त करुन राज्यपाल म्हणाले, राजभवन उभे रहावे यासाठी रात्रं दिवस कार्य करणाऱ्या मजूरांचे विशेष योगदान आहे. राज्यपाल म्हणून मला मिळालेल्या अधिकारात राहून मी जनतेच्या भल्याचे कार्य करण्याचा प्रयत्न करित आहे. वनजमिनीसंदर्भातील अपील करण्यासाठीचा अधिकार आधी जिल्हाधिकारी यांनाच होता आता तो अधिकार आयुक्तांकडे देण्यात आला. यामुळे हजारो लोकांना न्याय देता आला. कोविड काळात उत्तम कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्याचा राजभवनमध्ये सत्कार करण्याचे सौभाग्य मला लाभले. सुमारे पाच हजार लोकांचा या दरम्यान सत्कार करण्यात आला. यात विद्यार्थी, नर्स, अधिकारी, अभिनेते, स्वच्छता कर्मचारी यांना सन्मानित करता आले हा मी माझा सन्मान समजतो. मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई, २७ जाने : मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप (Shelf in Shop) या पद्धतीने वाईनची विक्री ही...
मुंबई, दि. 20 : स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारा महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अमरिश पटेल यांना सभापती...
मुंबई, दि. 19 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये (NRM) होणाऱ्या मृद व जलसंधारण कामांची प्रक्रिया आता पूर्णपणे...
ठाणे, दि. 12 :- स्त्रियांनी राजकारणात आपले नेतृत्व सिद्ध करत असताना स्वतःचा कृती आराखडा तयार करावा. स्त्री समानतेचा विषय हा...
ठाणे,दि. 30 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 1 जानेवारी 2022 रोजी दु....
ठाणे, दि. 30 : कोवीड संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गावातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल देशाच्या...
दीपावली पाडव्याच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांसोबत घेतला फराळ पोलिसांच्या जाण ठेवून केलं मिठाईचे वाटप ठाणे-प्रत्येक सणाला पोलीस आपले...
