Oplus_16908288
ठाणे,दि. 3 : माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इ.१२ वी, डिप्लेामा व पदवीपरीक्षेमध्ये किमान ६०% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत व त्यांनी Engineering, B.Tech, MBBS, BDS, B.Ed, BBA, B.Pharm, BCA, MBA व MCA इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अशा पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.पंतप्रधान शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमाची यादी www.ksb.gov.in या website वर उपलब्ध असून शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज ONLINE पध्दतीने भरावयाचे आहेत. हे अर्ज केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या www.ksb.gov.in या website वर उपलब्ध असून संबंधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी त्यांचा ONLINE अर्ज दि. ३१ डिसेंबर २०२६ पूर्वी सादर करावेत. अर्ज भरण्यापूर्वी लाभार्थ्यांनी वेबसाईटवरती देण्यात आलेल्या Annexure-1,2,3 च्या प्रती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कॉलेजचे Vice Chancellor/Principal/Vice Principal/Dean/Associate Dean/Registrar/Dy Registrar व बँक मॅनेजर यांची स्वाक्षरी घेवून सोबत ठेवावेत. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ONLINE अर्ज सादर करावेत, असे आवाहन ठाणे/पालघर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर प्रांजळ जाधव यांनी केले आहे.
