ठाणे, दि. १९ ऑगस्ट २०२६ : महामेट्रो रेलच्या माजिवडा, ठाणे येथील कार्यालयात ईडन वूड्स रहिवाशांनचे शिष्टमंडळ आणि महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर कार्यकारी संचालक, आणि सुरेश पाखरे ॲडमिनिस्ट्रेटिव अधिकारी आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत दिनांक १८ ऑगस्ट रोजी रिंगमेट्रो मार्गबदल व स्थानक जागेत बदलबाबत सविस्तर चर्चा झाली. रहिवाशांचा प्रमुख मुद्दा रिंगमेट्रो मार्गबदल आणि स्थानक जागेत बदलबाबत ईडन वूड्स रहिवाशी आग्रही आहेत.
खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करणं ही आपली जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि शहराचा विकासही योग्य पद्धतीने होईल, अशा समन्वयातून या मेट्रोचं काम करण्यात यावं.” असा स्पष्ट संदेश देखील त्यांनी यावेळी महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिला.
नागरिकांच्या सर्व सूचना आणि अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, तसेच त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, असा शब्द यावेळी महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ईडन वूड्स रहिवाशांना दिला.
सदर बैठकीत ईडन वूड्स कॉम्प्लेक्स मधून प्रतिनिधी रजनी पितळे, विवेक सोनार, श्रीदेवी पिल्लै, राजेश अनंतकृष्णन, विलास तसखेडकर, सुधांशू चौसाळकर, दिनेश कांडपाल, श्रीराम नगरकर, रवि अय्यर तसेच हिरानंदानी मेडोस मधून संतोष विश्वनाथन उपस्थित होते. रहिवाशांनी दिलेल्या मौल्यवान सूचना आणि अनुभवी अभियंता श्रीराम नगरकर, रवि अय्यर, राजेश अनंतकृष्णन यांनी मौलिक सूचना केल्या आणि तांत्रिक बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
