Oplus_16908288
ठाणे, दि. १४ जुन २०२५ : पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, राम मारुती रोड ठाणे या ऐतिहासिक शाळेचा शतक महोत्सवी समारोप सोहळा तसेच इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, ठाणे पूर्व या शाळेचा सुवर्ण महोत्सव सोहळा सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
१९२६ साली संस्थापक कै. वामन नारायण भोळे सर यांनी सुरू केलेल्या या शाळेने गेल्या शंभर वर्षांत शिक्षण, संस्कार व गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा जपत हजारो विद्यार्थी घडवले असून ते देश-विदेशात विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
“Life is Work” या ब्रीदवाक्याला अनुसरून संस्थेने सातत्याने प्रगती साधली आहे.या शतक महोत्सवी वर्षात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते २३ इंटरस्कूल व संस्था अंतर्गत शाळांच्या स्पर्धा, भव्य रॅली व शतक महोत्सव उद्घाटन, माहितीपट निर्मिती तसेच माजी विद्यार्थी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. श्री विद्याधर वैशंपायन अध्यक्ष पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ठाणे, प्रमुख पाहुणे मा. श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रमुख उपस्थिती मा. श्री. नरेश म्हस्के खासदार ठाणे लोकसभा मतदारसंघ, मा. श्री. संजय केळकर, आमदार- ठाणे शहर मा. श्री. निरंजन डावखरे आमदार- कोकण पदवीधर मतदारसंघ मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार -कोकण शिक्षक मतदार संघ, विशेष उपस्थिती मा.श्री संजय वाघुले ज्येष्ठ नगरसेवक ठाणे मनपा, मा.श्री संदीप लेले जिल्हाध्यक्ष ठाणे शहर भाजपा, मा. श्री अविनाश जाधव मनसे अध्यक्ष ठाणे- पालघर हे शाळेचे माजी विद्यार्थी व मा.श्री सुनेश जोशी नगरसेवक ठाणे मनपा मा.श्रीमती मृणाल पेंडसे नगरसेविका ठाणे मनपा मा. श्रीमती प्रतिभा राजेश मढवी नगरसेविका ठाणे मनपा उपस्थित राहणार आहेत
कार्यक्रमात 100 वर्षांचा गौरवशाली इतिहास” या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास शाळेचे माजी विद्यार्थी, निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या दोन्ही शाळांच्या वतीने करण्यात आले आहे.
