जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदरांजली वाहिली
ठाणे,दि.22 जुलै 2026 :- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्य शासनाने त्यांच्या जयंतीचा अधिकृत कार्यक्रमांत नव्याने समावेश केल्यानंतर, 22 जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत दिवंगत नेत्याच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, कोंकण विभागीय माहिती उपसंचालक संजू चव्हाण यांच्यासह इतर शासकीय अधिकारी प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली व्यक्त केली. प्रशासकीय कामातील त्यांची शिस्त, निर्णयक्षमता आणि राज्य विकासातील योगदानाची आठवण यावेळी उपस्थितांनी केला.
