अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
ठाणे, दि. 23 जुलै 2026 : भारतीय असंतोषाचे जनक आणि थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमात लोकमान्य टिळकांच्या देशासाठीच्या अतुलनीय योगदानाचे आणि उत्तुंग कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या अभिवादन सोहळ्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी लोकमान्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने, चिटणीस रेवण लेंभे तसेच तहसीलदार सचिन चौधर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पसुमन अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
