Oplus_16908288
ठाणे,दि. ०५ ऑगस्ट २०२६:- जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे येथील टाटा सुमो विक्टा वाहन क्र.एम.एच.-04-एएन-3436 हे वाहन नादुरुस्त / निकामी वाहन जसे आहे तसेच निर्लेखित करण्यात येणार आहे. हे वाहन निर्लेखित करण्यासाठी या कार्यालयामार्फत या अगोदरही बातमी काढण्यात आली होती, परंतु वेळेत निविदा प्राप्त न झाल्यामुळे दरपत्रके सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे येथे दि.10 ऑगस्ट 2026 पर्यंत निविदा सादर करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी ठाणे मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.
कार्यालयाच्या आवारातून खरेदी करावयाच्या शर्ती नुसार विक्री करावयाचे आहे. हे वाहन विक्रीने घेण्यापूर्वी शनिवार, रविवार व इतर सार्वजनिक शासकीय सुट्टींचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत पाहाण्यास उपलब्ध आहे. नंतर कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकली जाणार नाही. सादर केलेल्या निविदा मंजूर करणे अगर नामंजूर करणे या बाबतचे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी ठाणे यांच्या स्वाधिन राहतील. इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांच्याशी संपर्क साधून आपल्या निविदा सादर कराव्यात.
कार्यालयाचा पत्ता :- जिल्हाधिकारी कार्यालय आवार, भारतीय स्टेट बँकेच्यावर, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम पिन कोड- 400601.
