ठाणे, दि. 06 : मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडील पत्र क्र.No.23/2025-ERS(Vol.III) Dated 14/05/2026, No.23/2026-ERS(Vol.II) Dated 15/07/2026, No.23/2026-ERS(Vol.II) Dated 04/08/2026. या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR) कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन, दि.15 जुलै 2026 रोजीच्या पत्रान्वये सुधारीत कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
राज्यातील विशेष सखोल पुनरिक्षणाची (SIR) प्रगती विचारात घेऊन विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची विनंती मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यास्तरावर विनंती करण्यात आली होती. त्यानुसार मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. 04 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रान्वये विशेष सखोल पुनरिक्षणाचा (SIR) सुधारीत कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
पुनरिक्षणाचा टप्पा :- मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी.
सुधारीत कालावधी :- 30 जून 2026 ते 17 ऑगस्ट 2026.
पुनरिक्षणाचा टप्पा :- मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण / पुनर्रचना. सुधारीत कालावधी :- 17 ऑगस्ट 2026.
पुनरिक्षणाचा टप्पा :- प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी. सुधारीत कालावधी :- 24 ऑगस्ट 2026
पुनरिक्षणाचा टप्पा :- दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी. सुधारीत कालावधी :- 24 ऑगस्ट 2026 ते 26 सप्टेंबर 2026.
पुनरिक्षणाचा टप्पा :- नोटीस टप्पा / दावे व हरकती निकालात काढणे. सुधारीत कालावधी :- 24 ऑगस्ट 2026 ते 22 ऑक्टोबर 2026.
पुनरिक्षणाचा टप्पा :- अंतिम मतदार याद्यांचा प्रसिध्दी. सुधारीत कालावधी :- 27 ऑक्टोबर 2026.
वरील सुधारीत कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुदतीत कार्यवाही पार पाडण्यात यावी. तसेच मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडील दि.18 मार्च, 2026 व दि.18जून 2026 रोजीच्या निर्देशानुसार अधिसुचित केलेल्या सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सुधारीत कार्यक्रमाचे वेळापत्रक निदर्शनास आणून देण्यात यावे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे वैशाली माने यांनी कळविले आहे.
