ठाणे, दि १४ (जि मा का) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ४९ हजार १२० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७५ लाख ८२ हजार ६२६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ५१ लाख २० हजार २० नागरिकांना पहिल्या डोसचे तर २४ लाख ६२ हजार ६०६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ६४८ सत्र आयोजित करण्यात आले.
