ठाणे दि. 21 :- मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत माहे जानेवारी, 2022 साठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर जाहीर करण्यात आले आहेत.
प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती दोन किलो तांदूळ रु.3/- दराने व गहू रु.2/- दराने देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू मोफत देण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजनेत प्रति शिधापत्रिकेस एक किलो साखर रु.20 दराने मिळेल.
ठाणे विभागातील बिगर गॅसधारक शिधापत्रिकांना क्षेत्रनिहाय 46.49 रुपये ते 46.74 रुपये प्रति लिटर इतक्या दराने केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप 1 व्यक्तिस 2 लिटर, दोन व्यक्तिस 3 लिटर व 3 व त्यावरील व्यक्तिस 4 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे.

