ठाणे दि. 25 :- नागरी संरक्षण दलामध्ये स्वयंसेवक म्हणून नोंदणी व पुर्ननोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी नागरी संरक्षण दलाच्या http://maharashtracdhg.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन नागरी संरक्षण दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनेत नागरी संरक्षण दलाची मोठी भूमिका आहे. त्याचप्रमाणे नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी मदत कार्य केले आहे. यापूर्वी नागरी संरक्षण दलाची व्याप्ती ही फक्त शहरापुरती होती. आता त्यामध्ये बदल करून आता ती संपूर्ण जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे. त्याअनुसार ठाणे जिल्ह्यातील नागरी संरक्षण दलामध्ये स्वयंसेवक म्हणून नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन स्वयंसेवक नोंदणी व पुर्ननोंदणी अर्ज करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण संचालनालयाचे वरिष्ठ प्रशासिक अधिकारी (प्रशासन व धोरण)संजय जाधव यांनी केले आहे.

