






मुंबई, २६ जाने : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई
संलग्न कुणबी युवा मुंबई आणि कुणबी विद्यार्थी वसतिगृह यांच्या संयुक्तिक विद्यमाने २६ जानेवारी २०२२ प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर’ संपन्न झाले. प्रमुख वक्ते प्रा. सुनिल देवरे यांनी सुंदर मार्गदर्शन केले. सर्वांनी केडर कॅम्प अटेंड केल्याबद्दल धन्यवाद, सूत्रसंचालन सेक्रेटरी युवराज संतोष यांनी केले. गाव-वाडी, विभाग, मंडळ, संस्था, चळवळ, नेमकी कशी चालवायची, आपले कर्तव्य काय. नेतृत्व करताना, पद घेतल्यानंतर आपली वाटचाल कशी असायला हवीय. आपली जबाबदारी काय, कठीण काळात कोणती भूमिका घ्यावी. वर्षभर उपक्रम कोणते राबवायचे. मान-अपमान, सन्मान बाबत कशी भूमिका असावी. संघटनेचा प्रचार कसा करायचा, लिखाण, मुद्दे कसे असावेत. मुद्दे कसे मांडायचे, अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण त्यांनी दिले. मन, मस्तक, मेंदू सशक्त करण्याचा हा उपक्रम होता.
या शिबिराला कुणबी संघाचे सहसचिव अशोक करंजे, युवा मंडळाचे अध्यक्ष माधव कांबळे, उपाध्यक्ष डॉ. मंगेश सानप, अमेय खापरे, खजिनदार विजय भोसतेकर, मा. उपाध्यक्ष डॉ. सागर सानप, कुणबी महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आरती ठोंबरे, सहसचिव कु. युगंधरा काजरे, स्नेहा खापरे, राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष कृष्णाजी कोबनाक, राजापूर शाखेचे सेक्रेटरी अनिल भोवड, मा. संघ सहसचिव शांताराम आंग्रे, मा. सेक्रेटरी गिरीश बारस्कर, बबनराव कांबळे आणि 150 पेक्षा जास्त सक्रिय उपस्थित होते. सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत कुणबी ज्ञाती गृह, वाघे हॉल, परळ, मुंबई येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कुणबी युवा ब्रिगेड व कुणबी युवा प्रचारक यांना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आली. शेवटी स्नेहभोजन करून शिबिराची सांगता करण्यात आली.
