——-
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे मार्गदर्शन करणार
ठाणे दि. १ : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत अनुकंपाधारकांसाठी ऑनलाईन पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली अनुकंपा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता झूम लिंकवर मेळावा होणार आहे. तरी ठाणे जिल्हा परिषदेच्या अनुकंपा प्रतीक्षा सूचीवरील अनुकंपाधारकांनी दिलेल्या लिंकवर उपस्थित राहण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले आहे.
या मेळाव्यात शासन निकषानुसार उपलब्ध पदे व त्यासाठी सेवाप्रवेश नियमानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यवसायिक अहर्ता याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी सर्व अनुकंपाधारकांनी वेळेत उपस्थित राहावे.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी लिंक-
Meeting ID: 828 2583 6442
Passcode: 298516
———————
