मुंबई, दि.12: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज मुंबई, आय एन एस शिक्रा येथून वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टर मधून रत्नागरी कडे प्रयाण झाले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.
