ठाणे दि 14.:-– महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज.मो. अभ्यंकर हे शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकेला भेट देणार असून विविध योजनांचा आढावा घेणार आहे.
यावेळी त्यांच्यासोबत आयोगाचे सदस्य (सेवा) आर.डी. शिंदे, सदस्य (सामाजिक व आर्थिक) के.आर.मेंढे हे सुद्धा असणार आहेत. आयोगाच्या शिष्टमंडळाचे सकाळी 11.00 वा. मिरा भाईंदर महानगरपालिकेत आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत ते मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा तसेच अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांची भरती/पदोन्नती अनुशेष, सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेणार आहे. त्यानंतर दुपारी 01.00 ते 02.00 अनु. जाती जमातीच्या विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे.
