
मुंबई, परेल१९ फेब्रु : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई आणि Sustainable Hospitality Alliance तसेच “युवा परिवर्तन संस्था” आयोजित हॉटेल्स प्रशिक्षण सेमिनार शनिवार दि 19 फेब्रुवारी 2022 संध्याकाळी 4 ते 6 यावेळेत, कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल), सेंट झेवियर स्ट्रीट, परेल, मुंबई-12. येथे घेण्यात आले. प्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. कुणबी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थी यांनी सुरेख, नेत्रदीपक असे नियोजन केले होते. कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे, डॉ. मंगेश सानप, सहसचिव मिलिंद चिबडे, खजिनदार विजय भोसतेकर, प्रचारक सचिन देवळे, विशाल पाटील, संजय काजारे, शैलेश दळवी, कुणबी कला मंचाचे संजय वारीक, तसेच महिला मंडळाच्या सेक्रेटरी दिपीका आंग्रे, सहसचिव स्नेहा खापरे विवाह मंडळाचे सुनिल कुलये, उपस्थित होते. या सेमिनार मध्ये बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. रोजगार विभागाचे सुरज सोलकर, युगंधरा काजारे, दत्ता आंग्रे यांनी मेहनत घेऊन हे सेमिनार यशस्वी केले. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स बाबत युवा परिवर्तनचे भवानी सर व सुजैन मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थित उमेदवार नक्कीच आपले करियर घडवतील अशी आशा आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हस्ते परहस्ते ज्यांनी ज्यांनी सहयोग दिला त्यांचे आभार..!
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई
संलग्न: कुणबी युवा मुंबई
कुणबी युवा रोजगार विभाग
