ठाणे,१९ फेब्रु : कोरोनाच्या महामारीतून नुकत्याच सावरत असलेल्या महाराष्ट्रात आज तारखेनुसार शिव जयंती दिमाखात पर पडली. अगदी गल्ली बोळातही साजरी झाली. अखंड महाराष्ट्र शिव घोषनेने दणानून गेला होता. परंतु छञपती शिवाजी महाराज हे डॉल्बी लावून डोक्यावर घेऊन नाचवण्याचे व्यक्तिमत्त्व नाही तर त्यांचे विचार आणि त्यांची शिकवण डोक्यामध्ये घेण्याची गरज आहे. अशा विचारांवर चालणा-या राजे संस्कार प्रतिष्ठानन संस्थेने महाराजांचे विचार आणि सध्या त्या विचारांची गरज या विचार लक्षात घेऊन व्याख्यान माला आयोजित केली होती.
१९ फेब्रुवारी म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त राजे संस्कार प्रतिष्ठानने कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यान मालेत प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते
अॕडव्होकेट श्री अभिजीत सावंत यांचे “छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन आज काळाची गरज” व स्पर्धा परीक्षा (नागरी सेवा परीक्षा ) देणा-या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान : मा श्री.सचिन मोरे (अध्यक्ष, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय) यांनी भुषविले. या कार्यक्रमाला ‘राजे संस्कार प्रतिष्ठानचे’ अध्यक्ष प्रा. संभाजी शेळके, अॕड. मनोज बडगुजर, अॕड. राजेंद्र काकडे, प्राचार्य संतोष गावडे, श्री.सुरेश माने, श्री.संतोष म्हस्के, नवी पहाटचे संपादक मिलिंद महाडिक, श्री. अनिल कासार सर, श्री. सातपुते सर, श्री. निलेश शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास महेश शिराळकर , महेश चाळके, करण कनोजिया, सविता काकडे, राजश्री सुर्यवंशी, कविता रघुवंशी , विकास सातपुते, मंगेश कांबळे इ.चे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्याख्यानात अॕडव्होकेट श्री अभिजीत सावंत सरांनी शिवकाळाविषयी आणि नागरी सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यासक्रम, तसेच परीक्षेचे टप्पे याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुञसंचालन नेञा पांचाळ हिने केले. सर्वांचे संस्थेच्या वतीने अॕड. मनोज बडगुजर यांनी मनःपूर्वक आभार मानले.
.
