ठाणे, दि. 23 :- संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात तहसीलदार (सामान्य प्रशासन) राजाराम तवटे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अव्वल कारकून सुमेध राऊत यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.