
ठाणे, दि. २७ : दि: २४ फेब्रुवारी २०२२ रोजी कुणबी समजोन्नती संघ मुंबई च्या ठाणे शहर शाखेचा नवीन वास्तू बी विंग, २०८, आनंद सावली, गुरुकुल सोसायटी जवळ, ईस्टर्न हायवे, पांचपाखडी, ठाणे (प) मध्ये संपन्न झाला. शाखेचे सचिव मिलिंद महाडिक आणि सौ. सविता मिलिंद महाडिक यांच्या हस्ते वास्तू प्रवेश करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला ठाणे शहर शाखेचे अध्यक्ष श्री.शांताराम म्हादवे, सरचिटणीस श्री. मिलिंद महाडीक, विशेष उपस्थिती श्री.भूषण बरे-अध्यक्ष कुणबी समाजोन्तती संघ, मुंबई, श्री. चंद्रकात बावकर-अध्यक्ष्र ओ.बी.सी. संघर्ष समिती, श्री. कृष्णा कोबनाक-कुणबी राजकीय समन्वय समिती, संघ उपाध्यक्ष श्री. बबनराव उंडरे, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, संघ कार्यकारिणी सदस्य व कुर्ला शाखेचे श्री. भिकू गोवळकर व कुणबी विवाह मंडळ, मुंबईचे श्री. विष्णु निवाते यांनी उपस्थिती दर्शवली. कुर्ला शाखेचे श्री. भिकू गोवळकर व कुणबी विवाह मंडळ, मुंबईचे श्री. विष्णु निवाते यांनी भिंतीवरील घड्याळ शाखेला भेट दिले. कुणबी समाजोन्तती संघ, मुंबईचे अध्यक्ष श्री.भूषण बरे यांनी शुभेच्छा देत ठाणे शहर कुणबी समाजाला हक्काची जागा मिळाली, असे म्हणाले. ओ.बी.सी. संघर्ष समिती अध्यक्ष व माजी संघाध्यक्ष श्री. चंद्रकात बावकर यांनी शुभेच्छा देत पुढे आणखी भर देत ठाणे शहर शाखेचा उत्कर्ष करा, असे मत मांडले. जवाबदारी वाढली आहे, अपेक्षाही भरपूर आहेत असे सुचक विधान सरचिटणीस श्री. मिलिंद महाडीक यांनी श्री. बावकर साहेबाच्या वक्तव्यावर केले.
कुणबी युवा मुंबई अध्यक्ष माधवजी कांबळे, खजिनदार श्री. विजय भोस्तेकर, कुणबी युवा प्रचारक सचिन रामाणे आदि यांनी उपस्थित राहून कुणबी युवा मुंबई अध्यक्ष माधवजी कांबळे यांनी शाखेला व महिला मंडळाला शाल व विचाराचे पुस्तक भेट देऊन विशेष कौतुक केले. त्याच प्रमाणे कुणबी बांधव व मुलुंड शिवसेना शाखा क्र. १०७ चे कार्यालय प्रमुख श्री. अंनत कळवणकर, श्रीराम सेवा मंडळाचे सचिव श्री. संदिप जगदाळे, श्री. नितिन भोसले, श्री. गंगाराम भडवळकर, श्री. अंकुश म्हापार्ले, श्री. अंनत गोरिवले, श्री. विजय भोसले, श्री. संजय भेकत, श्री. विजय भेकत, श्री. विटमल, ठाणे खोपट येथील श्री. समीर पेंढारे, श्री. विजय भुवड, श्री. वैभव भेकरे, श्री. हेमंत इंगले, श्री. कल्पेश कापसे, समाज बांधव पञकार श्री. पुनित खांडेकर, जेष्ठ कुणबी कार्यकर्ते श्री. यशवंत बावकर, श्री. दत्ताराम भुवड, ठाणे राम नगरचे श्री. तुकाराम होडे, श्री. भिकाजी लाखण, बावकर, श्री. तुकाराम होडे, श्री. भिकाजी लाखण, श्री. बावकर, कुणबी महिला मंडळ-सौ. वंदना रेवाळे, श्रीम. लक्ष्मी महाडीक, श्रीम. उर्मिला शिंदे, महिला आघाडीचे सौ. रजनी अवेरे, सौ. शालिनी म्हादवे, सौ. सविता महाडीक, सौ. अंकिता म्हापार्ले, सौ. भारती कापसे, सौ. सुनिता हडसे, सौ. रेश्मा भुवड, सौ. विशाखा भेकरे, सौ. वनिता खोचाडे, सौ. वैशाली मांजरेकर आदि मान्यवर आणि कुणबी बांधव व भगीनी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे ठा.म.पा. नगरसेवक मा. श्री. राजेश मोरे, श्री. नारायण पवार, मा. नगरसेवक श्री. हिराकांत फर्डे यांनी सुद्भा भेट देऊन ठाणे कुणबी समाजाला शुभेच्छा दिल्या. आनंद सावली काॅ. ओ. हौ. सो. अध्यक्ष व शिवसेना शाखाप्रमुख, कुणबी बांधव श्री. संदिप जाखल यांनी सुद्भा भेट दिली व पुढे सहकार्य लागेल तर जरुर करु, असे म्हणाले. ® जन प्रकाश टाईम्स साप्ताहिक वृत्तपञाचे संपादक श्री. नरेश ठाकूर, पञकार श्री. शरद पवार यांनी कुणबी समाज कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा खेड उपाध्यक्ष श्री. तुकाराम निर्मल, उपखजिनदार श्री दिनेश मांडवकर, युवाध्यक्ष श्री मंगेश मांडवकर, सचिव श्री प्रवीण शिबे सहसचिव श्री शैलेश शिगवण, खजिनदार श्री विलास मूकनाक, युवा खेड चे आय.टी. प्रमुख श्री रुपेश तांबट आदी कुणबी बांधवानी उपस्थिती दर्शविली व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
यासाठी सर्व ठाणे शहर शाखेच्या पदाधिकार्यांनी मेहनत घेतली.कुणबी समाजोन्नती संघ, ठाणे शहर शाखेतर्फे आलेल्या सर्व मान्यवर व कुणबी कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
