
ठाणे दि. 15 :- मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत माहे मार्च, 2022 साठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियुत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर पुढीलप्रमाणे आहे.
योजना/पात्र लाभार्थी-प्राधान्य कुटुंब – तांदूळ रु. 3/- किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो, गहू रु. 2/- किलोदराने प्रती व्यक्ती 3 किलो.
योजना/पात्र लाभार्थी – अंत्येादय अन्न योजना – तांदूळ रु. 3/- किलो दराने प्रती शिधापत्रिका 17 किलो, गहू रु. 2/- किलोदराने प्रती शिधापत्रिका 18 किलो.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना-प्राधान्य कुटुंब व अत्योदय अन्न योजना प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू मोफत. अंत्योदय अन्न योजना – साखर रु.20/- दराने प्रति शिधापत्रिका 1 किलो.
बिगर गॅसधारक शिधापत्रिका केरोसीन मुंबई शहर व मुंबई उपनगर (04.03.2022) रु.61.38/- दराने 1 व्यक्ती 2 लिटर, 2 व्यक्ती 3 लिटर, व 3 व्यक्ती व वरील 4 लिटर. ठाणे विभाग केरोसीन (04.03.2022) 36/फ ठाणे रु. 61.75/-, 41/फ ठाणे रु. 61.75/-, 48/फ मुंब्रा रु.61.75/-, 41/फ वाशी रु. 61.75/-, 41/फ भाईंदर रु. 61.75/-, 38/फ कल्याण रु. 61.93/-, 39 फ डोंबिवली (मुख्य) रु. 61.93/-, 39/फ डोंबिवली (उप) रु. 61.93/-, 40/फ उल्हासनगर (मुख्य) रु. 62.00/-, 40/फ उल्हासनगर (उप) रु. 62.00/-, 46/फ (अंबरनाथ) रु.62.00/-, 46/फ (बदलापूर) रु.62.00/-, 37/फ भिवंडी रु. 61.84/- प्रती लिटर 1 व्यक्ती 2 लिटर, 2 व्यक्ती 3 लिटर, व 3 व्यक्ती व वरील 4 लिटर. असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी कळविले आहे.
