मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक सुप्रिया कुऱ्हाडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरुवार, दि. २४ मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत उपलब्ध पर्यटक निवास व उपहारगृहे, पुणे विभागातील पर्यटन स्थळे, शासकीय कर्मचाऱ्यांकरिता असलेल्या सवलती, पर्यटक निवासामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा, भविष्यातील नवीन प्रकल्प, योजना आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. दीपक हरणे यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.
