ठाणे, दि. ३० : आपला राजा, पूर्वज शंखासुर यांच्या हस्ते…….कोकण भूमीतील कुणबी बोलीतील अस्सल गावरान कविता……‘’काय समजलीव ” कवी: प्रशांत डिंगणकर यांच्या कवितांचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. 2 एप्रिल 2022 (गुढीपाडवा) रोजी दादा कोंडके एम्पीथेयटर, मेंटल हॉस्पिटल (ज्ञानसाधना जुन्या इमारत) समोर, परब वाडी, ठाणे (प). संपन्न झाला. त्यानिमित्त गुहागर तालुक्यातील दोडवलीकर नमन मंडळ यांचे “नमन” चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्यावेळी प्रमुख पाहुणे –मा. ऍड. आशिष शेलार (आमदार माजी शिक्षणमंत्री), मा. संजय केळकर (आमदार, ठाणे), मा. नरेश म्हस्के (ठाणे महापौर), मा. डॉ. महेश केळुस्कर (लोकप्रिय कवी), मा. श्री. माधव कांबळे (अध्यक्ष-कुणबी युवा मुंबई), तसेच कुणबी-ओबीसी बंधू, भगिनी युवा यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर व्यासपीठावर कार्यक्रमसाठी विशेष उपस्थिती मध्ये श्री. अभिजितपंत बालकेंद्री, मा. श्री. कृष्णा कोबनाक (कुणबीरत्न, रायगड), मा. श्री. बबन उंडरे (उपाध्यक्ष-कुणबी समाजोन्नती संघ, मुबंई),श्री. शांताराम म्हादवे (अध्यक्ष-कुणबी समाजोन्नती संघ, मुबंई. ठाणे शहर शाखा),. A
त्यानिमित्त गुहागर येधील दोडवली नमन मंडळाचा खेळी शंकासूराचा खास कला अविष्कार सादर करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. विशेष सन्मानित श्री. सत्यवान नर (ग्रंथ प्रचारक), लोकप्रिय दोडवली नमन मंडळ, दोडवली, ता. गुहागर, श्री. नंदकुमार कदम (माजी सचिव-कुणबी समाजोन्नती, संघ मुंबई, ठाणे शहर शाखा), श्री. मिलिंद महाडीक (सरचिटणीस-कुणबी समाजोन्नती, संघ मुंबई, ठाणे शहर शाखा) यांचा कार्यक्रमा निमित्त सन्मान करण्यात येणार आला.
———निमंत्रक——–
अमोल नाले: अनघा प्रकाशन, ठाणे
प्रा: मंदार टिल्लू : संचालक, गंधार, ठाणे
बाळकृष्ण ओडेकर: संचालक, गंधार ठाणे
सई प्राची प्रशांत डिंगणकर
