
मुंबई, दि. १८ प्रतिनिधी (पुनित खांडेकर) : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, संलग्न कुणबी युवा व कुणबी महिला मंडळ आयोजित, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव गुरुवार 14 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता, कुणबी ज्ञातीगृह, वाघे हॉल, सेंट झेविअर्स स्ट्रीट,परळ, मुंबई. येथे आयोजित करण्यात आला होता. जयंती निमित्त गुहागर- दोडवली शिवशक्ती महिला मंडळाने सावित्रीमाई फुले व आजची सामाजिक चळवळ या बाबत लेखिका स्वप्ना गोरीवले लिखित व शंकर कांबळे दिग्दर्शित ‘चला.. तिला समजून घेवूया” लघुनाट्य सादर करण्यात आले. निवेदिता निकम, सानवी मोरे, चरित्रा कांबळे आणि स्वप्ना गोरीवले यांनी संर्वांगसुंदर अभिनय केला. तसेच कुणबी कलामंच प्रस्तुत भेट महामानवाची : लेखक-युवराज संतोष, दिग्दर्शक-सुभाष गोताड अशी दोन लघुनाट्य सादर करण्यात आली. विनेश माटल, आदेश घडवले, सागर माटल, मंगेश नाचरे, विष्णू खापरे, बंदिश अवेरे या कलाकारांनी अभिनय संपन्न कलाकृती सदर केली.
सदर कार्यक्रमाला लाभलेले मार्गदर्शक प्राचार्य विजय मोहिते यांनी सामाजिक विषयावर मार्गदर्शन केले त्यात त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुणबी ओबीसी समाज या विषयावरती जास्त भर दिला.
जयंतीनिमित्त अनेक युवक युवती पारंपारिक वेशभूषा परिधान करून आले होते. महिला मंडळाच्या सहसचिव स्नेहा खापरे, डोंगरे आणि कुणबी वस्ती गृहाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम नियोजन केले होते. सूत्रसंचालन दिपिका आग्रे व युवराज संतोष यांनी केले. या कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष बबन उंडरे, सहसचिव अशोक करंजे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा पाटील, विवाह सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुरेश घडवले, कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे, खजिनदार विजय भोस्तेकर, प्रचारक भास्कर पवार, चंद्रकांत निंबरे बबनराव कांबळे, नारायण मोरे, राम चाळके, संजय खापरे, किशोर कांबळे, गणपत मांडवकर आणि सहकारी उपस्थित होते. सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


