ठाणे, दि. 20 : जिल्ह्यातील खासगी नोंदणीकृत फळ रोपवाटीका, कृषी विद्यापीठ व शासकीय रोपवाटिकांमधील विविध फळझाडे तसेच मसाला पिकांच्या रोपांचे विक्री दर राज्य शासनाने निश्चित केले आहेत. त्यामध्ये सर्वात आंबा कलमासाठी 80 रुपये तर पिशवीतील नारळ रोपांसाठी 200 रुपये दर निश्चित करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी कळविले आहे.
सुमारे 29 प्रकारच्या फळ आणि मसाला रोपांचे निश्चित केलेले हे दर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम, विविध शासकीय योजना तसेच किरकोळ विक्रीसाठी लागू राहणार आहेत.
2022-23 साठी निश्चित केलेले प्रति नग दर असे: आंबा कलमे- 80 रुपये, काजू कलमे- 60, चिकू कलमे-90, पेरू कलमे-60, कागदी लिंबू रोपे (पिशवीतील)-35, सीडलेस लिंबू कलमे- 40, आवळा कलमे- 50, आवळा रोपे- 20, चिंच कलमे (विकसीत)- 70, कोकम कलमे- 40, फमस कलमे- 50, लिची रोपे-25, सिताफळ कलमे-50, अंजीर कलमे- 40, जांभूळ कलमे- 70, करवंद कलमे- 50, नारळ रोपे (बाणावली व इतर)-100, नारळे रोपे (टीXडी)- 120, नारळ रोपे पिशवीतील -200, सुपारी रोपे- 35, खिरणी रोपे- 25, मिरी रोपे -20, दालचिनी कलमे-40, लवंग रोपे-35, जायफळ कलमे-60, तेलताड रोपे- 40, आंबा, संत्रा, मोसंबी, बोर, चिकू, काजू, चिंच, आवळा स्टीक-8 रुपये, पानपिंपरी कलमकांडी दोन रुपये.
