ठाणे दि. 15 :- ठाणे जिल्ह्यातील मातंग समाज व त्याच्या पोटजातीतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने “साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे शिष्यवृत्ती ” देण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी २१ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळ (मर्या.) जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाजातील मांग, मातंग, मिनीमादीग, मादींग, दानखणी मांग, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा, मांग महाशी या १२ पोटजातीतील इयत्ता १० वी, १२ वी तसेच पदवी, पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमात ६० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. जेष्ठता व गुणक्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुण प्रमाणपत्र, २ छायाचित्रे व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादीसह दोन प्रतीत अर्ज सादर करावा. अर्जामध्ये पूर्णपत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. हे अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, ५ वा मजला, कोर्टनाका, ठाणे ४००६०१ (दूरध्वनी क्र. २५३८८४१३) येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत दि.२१ जुलै २०२२ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती राणे यांनी केले आहे.
