ठाणे ः महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनासाठी आणि शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांसाठी कार्यरत असलेली सेवाभावी संस्था शिवशंभु प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांनी वार्षिक सभा ठाण्यातील शासकीय निवासस्थान येथे रविवारी संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यवान जाधव यांनी कोविडच्या काळात संस्थेने केलेल्या सेवेबद्दल व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे कौतूक करत आपल्याला सेवाभावी उपक्रमांत भरारी घेत कार्यकर्त्यांची टीम वाढवून तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचण्याची इच्छा व्यक्त केली.
शिवशंभु प्रतिष्ठान ही संघटना 2016 पासून कार्यरत आहे.मुबंई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, पुणे, या जिल्ह्यांतील गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेच्या अनेक मोहिम संस्थेने राबवित नागरिकांनाही शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि मावळ्यांच्या इतिहासाने पावन झाल्याने त्यांचे पावित्र्य राखण्यासाठी आवाहन करीत असते. तसेच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, टिटवाळा परिसरात शैक्षणिक, सामाजिक कार्यात कार्यकर्ते करीत असलेली मेहनत अजून वाढविण्यासाठी संस्थेला स्वतःची ओेळख निर्माण करण्यासाठी जिथे जिथे शक्य असेल तिथे प्रशासनाच्या पाठीशी लागून कामे करून घेता आली पाहिजेत. असा विश्वास सत्यवान जाधव यांनी व्यक्त केला. या बैठकीला ठाणे, कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, रत्नागिरी, रायगडमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
