दि:- ४ ऑगस्ट, पुनित खांडेकर (प्रतिनिधी) : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड संलग्न कुणबी युवा खेड यांच्या वतीने दि.७ ऑगस्ट २०२२ रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा वाघे हॉल परेल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून ॲ.रोशन पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय युवा महामोर्चा) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे या तत्वाला समोर ठेऊन कुणबी युवा खेड यांच्या वतीने दि.७ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा वाघे हॉल परेल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वकील रोशन पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय युवा महामोर्चा) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रोशन पाटील हे उत्कृष्ट वक्ता, संगठक, मार्गदर्शक, प्रबोधनकार, कार्यकर्ता प्रशिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी उपयोग होईल.
