ठाणे, दि. 12 ः ठाण्यातील चंदनवाडी परिसरात राहणारे पुंडलिक मोरे यांच्या भगिनींना रिक्षा चालक मोहम्मद खान कुरेशी (रा. ख्वाजा पॅलेस, राबोडी यांच्या रिक्षा नंबर (एमएच 04 एचजे 4564) हे चंदनवाडीतून भाडे घेऊन विटाव्याला गेले. त्यातील 3 महिलांचा गणपतीसाठी घेतलेले कपडे इतर समान रिक्षातच राहिले होते. येथील साईबाबा सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजू चापले यांनी परिसरात बसविलेल्या सीसी टीव्हीच्या माध्यमातून रिक्षा मिळाली आणि पोलिसांच्या साह्याने मोबाईल नंबर मिळाले. पण ते रिक्षाचालक इतके इमानदार होते की त्यांनी त्या महिलांना शोधण्यासाठी खूप धडपड केली. अखेर चंदनवाडीत त्याने पुन्हा गल्लोगल्ली चौकशी केल्यानंतर पुंडलिक मोरे यांच्या त्या भगिनी असल्याने त्यांना रिक्षाचालकाने साड्या व इतर सामान आणून दिले. परिसरातील नागरिकांनी त्या रिक्षाचालकाचे आभार व्यक्त करत त्याच्या इमानदारीचे कौतूक केले.
