ठाणे, दि. १५ (प्रतिनिधी) : ठाण्याच्या राबोडी या मुस्लिम बहुल विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “तिरंगा रॅली” काढण्यात आली. या रॅलीमध्ये सामाजिक एकात्मतेचा संदेश देणार्या घोषणा देण्यात आल्या.

नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये ७५ फूट लांबीचा तिरंगा घेऊन शेकडो विद्यार्थी, हिंदू, मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थी सैनिक, राष्ट्रपुरुषांची वेशभूषा करून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मुस्लिम बहुल भागातील ही पहिलीच तिरंगा रॅली असूनही नागरिकांनी आपला प्रचंड सहभाग नोंदविला.
यावेळी मुल्ला यांनी, सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी ही रॅली आयोजित केली होती. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना लहान मुले आणि तरूणांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास ज्ञात व्हावा, या उद्देशाने ही रॅली आयोजित केली होती, असे सांगितले

Good day! I simply want to give you a huge thumbs up for your excellent info you have here on this post. I am returning to your web site for more soon.