ठाणे, दि. १५ पुनीत खांडेकर (प्रतिनिधी) : वैचारिक क्रांती घडवून आणायची असेल, आपल्या हक्क अधिकारावर बोलायचं असेल तर युवापिढीला वक्त करावं लागेल त्यांना भाषण काव्य यांच्या माध्यमातून बोलत करावं लागेल हाच दूरदृष्टी विचार डोळ्यासमोर ठेऊन कुणबी सामाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जागर लोकसाहित्याचा अंतर्गत काव्यवाचन आणि वक्तृत्व स्पर्धास्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, या स्पर्धा अनेक स्पर्धक आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत कुणबी ज्ञातीगृह वाघे हॉल परळ येथे अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. सर्वच स्पर्धक यांनी वेगवेगळे विषय हाताळत उपस्थित समाजबांधवांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

प्रथम सत्र युवाध्यक्ष माधव कांबळे आणि द्वितीय सत्र शैलेश कावनकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या स्पर्धेस परीक्षक म्हणून प्रशांत डिंगणकर, सुभाष गोताड आणि साहायक म्हणून पुनीत खांडेकर यांनी काम पाहिलं तब्बल 45 स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे :-
स्पर्धा परीक्षक: प्रशांत डिंगणकर (लेखक-कवी फेम कुणब्यांचा गावगाडा-काय समजलीव?)
सुभाष गोताड-नाट्यदिग्दर्शक
वक्तृत्व स्पर्धा निकाल
प्रथम-विवेक वारभुवन-नवी मुंबई
द्वितीय-भाग्येश्री सोनावणे-रायगड
तृतीय-श्रेयस सनगरे-रत्नागिरी
उत्तेजनार्थ-कुलदीप नामाणे-उस्मानाबाद
विशेष सन्मान-संकेत माईन (उपसरपंच) लांजा
काव्यवाचन स्पर्धा निकाल
प्रथम-अस्मिता युवराज (गुहागर)
द्वितीय-विवेक वारभुवन (नवी मुंबई)
तृतीय-संतोष गमरे (संगमेश्वर)
उत्तेजनार्थ – योगिता रवींद्र पाष्ठे (सिंधुदुर्ग)
सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील दैदिप्यमान वाटचालीस शुभेच्छा
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज संतोष, संजय काजारे यांनी केले.
ही स्पर्धा पार पाडण्यासाठी स्वतःला झोकून देत विशेष परिश्रम घेतले ते सुरज सोलकर- निलेश कुलये-गिरीशजी बारस्कर- सचिन रामाणे-अविनाश आग्रे- दिलीप शेडेकर-संजय वारीक- शैलेश दळवी-दिपिका आग्रे- स्नेहा खापरे-श्वेता कावनकर

जय कुणबी
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐
कुणबी युवा मुंबई


Good day! I simply want to give you a huge thumbs up for your excellent info you have here on this post. I am returning to your web site for more soon.