मुंबई’ दि. २१ चिञलेखा रासने(प्रतिनिधी) : अ भा सो क्ष कासार समाज मध्यवर्ती मंडळ यांच्या प्रेरणेने, कासार समाजातील गायकांचा समूह या संकल्पनेतून साकारलेल्या कासार आयडॉल सिझन २ या स्पर्धेची उपांत्य फेरीची ऑडिशन दि. २१/०८/२२ रोजी, सौ. नलिनी यशवंतराव दोडे विद्यालय, मुंबई या ठिकाणी अतिशय दिमाखात व उत्साहात ऑडिशन संपन्न झाली.
श्री राजेश दोडे ,अध्यक्ष सो क्ष कासार समाज कल्याण मंडळ मुंबई, श्री अशोक जवकर विभागीय अध्यक्ष मुंबई, श्री उमाकांत रासने मध्यवर्ती उपाध्यक्ष, श्री देवराज गरगटे कोकण विभागीय अध्यक्ष, कासार आयडॉलचे प्रवर्तक श्री केशव कुंभकर्ण व श्री योगेश शेटे, श्रीमती स्वाती रोकडे , श्री अशोक इटकर या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमास सुरुवात झाली.

कासार आयडॉल मुळे कासार समाजातील सर्व वयोगटातील गायनाची आवड असणाऱ्या समाज बांधव, भगिनींना एक भव्य व्यासपीठ निर्माण झाले आहे . यावर्षी ४८८ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे नसून स्पर्धेत भाग घेणे हे महत्त्वाचे आहे . त्यामधूनच “सुर नवा ध्यास नवा” अशा स्पर्धांमध्ये कासार समाजाचे स्पर्धक चमकतील अशी भावना श्री अशोक जवकर यांनी प्रास्तविक भाषणात व्यक्त केली
उत्कृष्ट ऑर्गन ,ढोलकी व कीबोर्ड असा सुंदर वाद्यवृंद असलेल्या लाईव्ह ऑडिशन मध्ये स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेतील स्पर्धकांची आंतरराष्ट्रीय परीक्षक श्री अतुल पवार सर व सौ दिपाली कुलकर्णी यांनी प्रशंसा केली व भविष्यात कासार समाजात उत्कृष्ट गायक तयार होवो अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रथमच आपण मुंबई कोकण साठी स्वतंत्र ठिकाण निवडले. मुंबई व कोकण टीमने जय्यत तयारी करत या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले असे श्री केशव कुंभकर्ण यांनी नमूद केले. त्यांनी सो.क्ष कासार समाज कल्याण मंडळ मुंबई, व मध्यवर्ती मंडळाचे मुंबई विभाग व कोकण विभागाचे आभार मानले.
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. या रंगतदार कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीमती स्वाती रोकडे व श्री देवराज गरगटे यांनी केले.
मुंबई ऑडिशन चा कार्यक्रम ही स्पर्धा नसून सुरेल गाण्यांचा एक सुंदर कार्यक्रम होता व हा कार्यक्रम कधीच संपू नये असे वाटत होते अशी प्रतिक्रिया काही श्रोत्यांनी दिली. कासार समाजाच्या बंधू-भगिनींमध्ये कलागुणांना वाव देणारा एक आगळावेगळा कार्यक्रम मुंबईमध्ये प्रथमच झाल्याचे काही श्रोत्यांनी सांगितले. उत्कृष्ट कार्यक्रम, सुंदर नियोजन व चवदार नाश्ता व भोजन अशा तिन्ही आघाड्यांवरती हा कार्यक्रम एक नंबर झाल्याची पोच पावती श्रोत्यांनी प्रत्यक्ष व फोन करून दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजेश दोडे सर, श्री अशोक जवकर, श्रीमती स्वाती रोकडे ,श्री देवराज गरगटे, सौ वैशाली टोंगे ,सौ अनिता चिवटे, श्री प्रकाश कोळपकर , तसेच श्री केशवजी कुंभकर्ण आणि महाराष्ट्र कला साहित्य कोअर कमिटी मधील सर्व पदाधिकारी यांनी योगदान दिले. सर्वांचे मनःपूर्वक आभार.
*स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद अश्या पध्दतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
