ठाणे दि.22 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 9 व्या बलिदानदिनानिमित्त पुण्यात विवेक निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले ,अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे, साहित्याचे अभ्यासक डॉ. शशिकांत पट्टन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे व अनिल करवीर, अतुल सवाखंडे, सचिन गोवळकर अशोक निकम, बालाजी राऊत, धर्मराज चौरे, सारिका देहनकर, गजानन गायकवाड, घनश्याम येणगे, रेश्मा खाडे, विनोद खरटमोल, शीतल वसावे, अरविंद शिंदे, पी. एम. जाधव, प्रदीप हिवाळे, राजेश देवरुखकर अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी मार्गदर्शन केले.ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी केली. महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील कार्याध्यक्ष माधव बावगे, वाचन साहित्याचे अभ्यासक डॉ. शशिकांत पट्टन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाची सुरुवात श्री.गोवळकर,करवीर यांनी प्रबोधनात्मक गित गाऊन केली.
राज्य प्रधानसचिव संजय बनसोडे यांनी प्रस्तावित व राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी सूत्रसंचलन केले.
