मुंबई, दि. 27 चित्रलेखा रासने(प्रतिनिधी) : डॉ. नीतीन दत्तात्रेय आरेकर यांची शब्दांकित आणि माझं क्षितिज या डिंपल पब्लिकेशन प्रकाशित दोन पुस्तकांचं प्रकाशन बुधवार दि.२४ ऑगस्ट २०२२ रोजी रवींद्र नाट्यमंदिर मिनी सभागृहात कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर, पद्मभूषण संगीतसम्राज्ञी बेगम परवीन सुलताना, पद्मश्री अभिनेते मनोज जोशी ऋतुरंग दिवाळी अंकाचे संपादक अरुण शेवते रवींद्र नाट्यमंदिरचे संचालक श्री.रोकडे आणि सूत्रसंचाललीका समीरा गुजर-जोशी आणि अशोक मुळे यांच्या प्रमुख उपस्थित दिमाखदार संमारंभात झाले.
संमारंभास मानव्यर अतुल परचुरे, सोनिया परचुरे, विधिज्ञ राजेंद्र पै, बीना पै, ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, संगीतकार कौशल इनामदार, सतीश भावसार, आरती कदम, मीनाक्षी पाटील, अविनाश कोल्हे, डॉ.गणेश चंदनशिवे, डॉ. शत्रुघ्न फड, डॉ. नंदा मेश्राम राजहंसचे श्री.पणशीकर ग्रंथालीचे श्री.सुदेश हिंगलासपूर, निनाद प्रधान, धनश्री दामले डॉ.लक्ष्मण शिवणेकर, रवी प्रकाश कुलकर्णी आदी मानव्यर उपस्थित होते.

अभिनेता मनोज जोशी यांनी भैय्या या व्यक्तीचित्रांचं मनभावन अभिवाचन केले. बेगम परवीन सुलताना यांनी सांगितले की आसाम माझी जन्मभूमी असली तरी मुंबई,महाराष्ट्र माझी कर्मभूमि आहे.याचा मला अभिमान वाटतो. त्यांनी भाषणाणाच्या शेवटी भैरवी गाऊन रसिकांची वाहवा मिळवली. त्यांच्या भाषणाच्या शेवटी सर्व रसिकांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. हा कार्यक्रम डिंपल पब्लिकेशन आणि पर्पल इव्हेंटचे श्री.संतोष जोशी आणि प्रियांका साठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
