नवी दिल्ली, दि. 1 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : आसाम जवळील भारत-चीन सीमेवर फायटर जेट उडवत महिला पायलट देशाचं संरक्षण करत आहेत. आसाम मध्ये तीन महिला वैमानिकांनी मंगळवारी लढाऊ विमानं उडवत शत्रूला आपल्या देशाची ताकद दाखवून दिली.
त्यामुळे सीमेवर सैनिकांच्या बरोबरीने महिला वैमानिक देखील देशाचं संरक्षण करत आहेत. महिला वैमानिक अरुणाचल प्रदेश-आसामच्या पूर्वेकडील सेक्टरमध्ये लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर उडवत आहेत. मंगळवारी सुखोई-30 फायटर जेटमधून महिला वैमानिकांनी उड्डण केलं. याचे फोटो देखील समोर आले आहेत.
आसाममधील तेजपूर येथील पूर्वी सेक्टरमधील फॉरवर्ड बेसवरून यांनी सुखोई-30मधूल उड्डाण केलं. फ्लाईट लेफ्टनंट तेजस्वी देशातील एकमेव महिला वैमानिक आहे, ज्या सुखोई विमानाच्या शस्त्र प्रणालीचे पायलटिंग म्हणजेच वेपन सिस्टीम ऑपरेटींग करण्यात सक्षम आहे. तर भारताच्या सैन्य दलात आता देशाच्या रक्षणासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे देशासाठी ही अभिमानाची बाब आहे.
