मुंबई, दि. 12 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, मला पातळी सोडून बोलता येत नाही. पण पक्ष वाचवण्यासाठी मी वेगळं होण्याची भूमिका घेतली.
महाविकास आघाडीच सरकार असताना माझ्या सहकारी आमदारांना रोज त्रास होयचा. याची आम्ही वरिष्ठांना कल्पना दिली होती. पण आमचं कोण्हीच ऐकलं नाही. त्यामुळे गेल्या 3 महिन्यापूर्वी इतिहास घडवला.
मात्र नवीन सरकार स्थापन करताना आणि महाविकास आघाडी सरकार पाडताना देवेंद्र फडणवीस यांची साथ होती का? या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस यांची साथ होती त्यामुळेच एवढं सगळं शक्य झालं, असं स्पष्टीकरण शिंदेनी दिलं. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
त्यानंतर 2019 ची चूक सुधरायला अडीच वर्ष का लागली? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारला. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ काळ जुळून यावी लागते, असं उत्तर दिलं.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, या सगळ्या गोष्टी घडवून यायला योग्य योग वेळ यावी लागते. मधल्या काळात कोविड होता. त्या काळात असं काही केलं असतं तर कोविड असताना असं का करताहेत असा प्रश्न विचारला गेला असता. त्या काळात आम्ही प्रयत्न करत होतो. अखेर तीन महिन्यांपूर्वी आम्ही तुमच्या मताचा आदर केला, असं शिंदे म्हणाले.
