मुंबई : 16 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : आज राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांच्या 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तर सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सर्व जिल्ह्यांमधील मतदानाची तयारी पूर्ण झालीय.
आज राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होतेय. मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
आज होणारी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे. या निवडणुकीचा निकाल सोमवारी (17 ऑक्टोबर) लागणार आहे.
आज 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाल्यानंतर उद्या सोमवारी मतमोजणी होतेय. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झालीय. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.
