मुंबई :21 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : तुम्हीं ठाण्यात सभा
लावा, मी आलो असे समजा, असं वक्तव्य शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. माजी मंत्री संजय देशमुख आणि ठाण्याचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, माझी भूमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण विद्यार्थी बदलत आहेत, पण शिक्षक एकच आहे, आणि बोलायचे तेच असते. शिवसेना संपवायला निघालेल्यांना कल्पना नव्हती, की ज्या ज्या वेळी शिवसेनेवर आघात झाले, तेव्हा ती दसपटीने नाहीतर शतपटीने मोठी झाली आहे
ठाण्यातील सर्वजण चिडीचूप झाले आहेत, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व चिडीने पेठून उठले आहेत. माझ्या हातात काही नसले तरी, माझ्या हाताला ताकद देण्याचे काम तुम्ही करत आहात. तुम्ही ठाण्यात सभा लावा, मी आलो असे समजा.
