शिर्डी, दि. 23 ऑक्टो : उद्याेगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी शिर्डींच्या साईंच्या चरणी 1 कोटी 51 लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. अनंत अंबानी हे दिपावलीच्या मुहूर्तावर साई चरणी नतमस्तक हाेण्यासाठी आले हाेते.
मुकेश अंबानी अंबानी शिर्डीत आल्याने मंदिर परिसरात पाेलिस बंदाेबस्त हाेता. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी अनंत अंबानी यांचे स्वागत केले. अंबानी हे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित हाेते.
अंबानी यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या महिनाभरात दोनवेळा त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला होता. यावेळी अनंत अंबानी यांनी साईंची मनाेभावे पूजा अर्चा केली. त्यानंतर साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे अनंत अंबानी यांनी एक काेटी 51 लाख रुपयांची देणगी सुपुर्द केली.
