नागपूर, दि. 26 ऑक्टो (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याने आगामी निवडणुकांमध्ये मनसे-भाजप-शिंदे गट युती होणार असल्याचं बोललं जात आहे.
यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, दीपोत्सवानिमित्त राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं होतं. दिवाळीचा सण राज्यात आनंदात साजरा होतोय. आम्ही दीपोत्सवात उपस्थित राहिलो होतो, तेव्हा कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. सण उत्सवाबाबत आम्ही बोललो होतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
