मुंबई, दि. 15 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खानने आजवर अनेक हिट, सुपरहिट सिनेमांत काम केलं. मात्र काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. याच आमिरने मोठा धसका घेतला असून त्याने मोठा निर्णय घेतला आहे. आमिरने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एका कार्यक्रमादरम्यान आमिर खान म्हणाला,”एखादी भूमिका साकारताना मी त्या भूमिकेला 100 टक्के देत असतो. दिवस-रात्र मी फक्त त्या भूमिकेचाच अभ्यास करत असतो. ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमानंतर मी ‘चॅम्पियन्स’ नावाचा सिनेमा करणार होतो. उत्कृष्ट कथानक असलेला हा गोड सिनेमा आहे. पण मला सध्या सिनेसृष्टीपासून ब्रेक हवा आहे. मला सध्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा आहे.”
आमिरने दीड वर्ष सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 35 वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे. आजवर कुटुंबापेक्षा सिनेमाकडे मी जास्त लक्ष दिलं आहे. त्यामुळे कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी आमिरने हा निर्णय घेतला आहे.
