पुणे, दि. 21 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला असून या विचित्र अपघामध्ये तब्बल 48 वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी सर्वत्र ऑइल पसरले असून पुणे ते सातारा वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. पुणे – पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये 48 गाड्यांचे नुकसान झाल्याचे समजत आहे. 48 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिलीय. अग्निशमन दलाच्या दोन रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी ऑईल पसरले असून रस्ता निसरडा झाला असून चालणे देखील अवघड आहे. आंध्र प्रदेशातून आलेल्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
खेड शिवापूर टोल नाका येथे संपर्क साधून तेथून रुग्णवाहिका व इतर वाहने पाठविण्यात आली आहेत, तसेच वाहतूक वळविण्यात आलीय. नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकूण 48 वाहने समाविष्ट असल्याचे समोर आलेय. पीएमआरडीए अग्निशमन दल बचावकार्य करत आहे. अपघातातील 10 जखमींवर शासकीय रुग्णवाहिका 108 मध्ये उपचार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
