रशिया, दि 26 नोव्हेंबर नोव्हेंबर(प्रतिनिधी) : युक्रेन युद्धपरिस्थिती दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ पोहचल्या होत्या. त्यामुळे भारतात देखील पेट्रोल-डिझेलचे दर गगणाला भिडले होते. त्यावेळी पेट्रोल 125 रुपये प्रति लिटर झाले होते. तर डिझेल देखील 100 रुपयांजवळ पोहचले होते.
मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 83.63 डॉलर प्रति बॅरल इतका होता. तर, WTI क्रूड ऑईलचा दर 76.28 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. जवळपास दोन टक्क्यांची घसरण कच्च्या तेलाच्या दरात झाली आहे.
दुसरीकडे मात्र कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू असतानाही केंद्र सरकार आणि इंधन कंपन्यांनी भारतीय ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. इंधन कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले असून त्यात कोणताही बदल झाला नाही. तर, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करातही कपात केली नाही.
