मुंबई, दि. 27 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : स्वत:च्या स्वार्था साठी कोणाचाही हात हातात घेऊन मागे जाऊन बसणाऱ्यांपैकी मी नाही. प्रकृतीचे कारण सांगून घरात बणाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली. आजा राज्यभर फिरत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का? असा हल्लाबोल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केलाय.
राहुल गांधींची लायकी आहे का सावरकरांबद्दल बोलायची? अहो, सावरकरांनी जे केलं तो रणनीतीचा भाग होता. जेलमध्ये सडण्यापेक्षा बाहेर येऊन मला जो लढा द्यायचा तो देऊ या. हि रणनीती ज्याला कळत नाही तो गुळगुळीत मेंदूचा, राज ठाकरेंनी राहुल गांधींवर टीका केलीय.
“आपलं वय काय? आपण बोलतोय काय? काय चाललंय या महाराष्ट्रात? राज्यपाल पदावर बसलाय म्हणून मान राखतोय. नाहीत तर महारष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलाय.
मनसेची आंदोलनं विस्मरणात जातील यासाठी काही जणांकडून स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येत आहेत. परंतु, मनसेच्या आंदोलनावर पुस्तिका काढणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली. अजूनही वातावरणात निवडणुका दिसत नाहीत. महाराष्ट्रात सध्या फक्त खेळखंडोबा सुरू आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर मनसेच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
