मुंबई, दि. 21 डिसेंबर (प्रतिनिधी) : सत्तातंराच्या संघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन झालं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊ चौधरी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय. चौधरी यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संजय राऊत यांच्या कायम सावली सारखे बरोबर राहणारे म्हणून भाऊ चौधरी यांची ओळख आहे. भाऊ चौधरी हे नाशिकचा कारभार सांभाळत होते. संजय राऊत तुरुंगात जाताना आणि तुरुंगातून बाहेर येताना देखील भाऊ चौधरी त्यांच्या बरोबर होते. परंतु, आता ते शिंदे गटाचा प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, भाऊ चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या माहितीनंतर त्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलीय. शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे.
भाऊ चौधरी यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून शिंदे गटाचे नेते सुहास कांदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावलाय. “मैत्री वेगळी आणि राजकीय भविष्य वेगळे असतं. त्यामुळे भाऊ चौधरींना वाटलं असेल की ठाकरे गटापेक्षा शिंदेंसोबत भविष्य उज्वल असेल. भाऊंना काढून टाका असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे, असा ट्वीटमध्ये उल्लेख आहे.
