22 डिसेंबर (प्रतिनिधी)
नवी दिल्ली : सरकारने कॅन्सर, डायबिटीस, ताप, कावीळसह अनेक गंभीर आजारांवरील अत्यावश्यक औषधांच्या यादीतील 119 औषधांची किंमत 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. त्यामुळे आता कॅन्सर, डायबिटीस, ताप, कावीळसह अनेक गंभीर आजारी व्यक्तींना तसेच सामान्य रूग्णांना दिलासा मिळणार आहे.
कॅन्सरवरील औषधं सर्वाधिक म्हणजे 40 टक्के स्वस्त मिळतील. येत्या काळात अत्यावश्यक औषधांमधील आणखी काही औषधांची किंमत कमी केल्या जातील अशी माहिती देण्यात आलीय. नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायझिंग अथॉरिटीच्या बैठकीत या यादीतील 119 प्रकारच्या औषधांची कमाल किंमत निश्चित करण्यात आलीय. यामध्ये तापावरील पॅरासिटामोल, रक्तातील युरिक अॅसिड कमी करणाऱ्या औषधांचा समावेश आहे.
कोरोनाकाळामध्ये अनेकांना विविध आजारांची सुरूवात झाली. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्या लोकांना दिलासा मिळणार आहे. तर वाढत्या महागाईमुळं अर्थिक संकटाला सामोरे जाताना. लोकांकडे विविध आजारांची औषध खरेदी करणं मात्र अत्यावश्यक असतं. त्यामुळे सरकारकडून अनेक गंभीर आजारांवरील अत्यावश्यक औषधांच्या यादीतील 119 औषधांची किंमत 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली.
