नवी दिल्ली, दि. 23 डिसेंबर (प्रतिनिधी) : प्रविण बांदेकर यांच्या या कादंबरीची साहित्य अकादमी पुरस्कार 2022 साठी निवड झालीय. साहित्य अकादमीच्या वार्षिक साहित्य पुरस्कारासाठी मराठी व कोकणी या दोन्ही भाषांतील कादंबऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या कादंबरीची निवड झाली.
तर कोकणीसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या ‘अमृतवेल’ कादंबरीची निवड करण्यात आली. साहित्य अकादमी पुरस्कारात प्रत्येकी १ लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे स्वरूप असून अकादमीच्या साहित्य अक्षरोत्सवात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
दरम्यान, प्रमोद मुजूमदार यांना काश्मीरबाबतच्या सलोख्याचे प्रदेश-शोध सहिष्णू भारताचा, या वरिष्ठ पत्रकार सबा नक्वी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत २३ भाषांतील साहित्यकृतींना अकादमी सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अकादमीचे सचिव डॉ. के श्रीनिवास राव यांनी सांगितले.
दरम्यान, यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ७ काव्यसंग्रह, ६ कादंबऱ्या, २ कथासंग्रह, ३ नाटके, २ टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी १ आत्मकथन, लेखसंग्रह व एतिहासिक कथासंग्रहाची निवड करण्यात आल्याचेही राव यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक भआलचंद्र नेमाडे, ज्येष्ठ संपादक व खासदार कुमार केतकर आणि प्रा. नितीन रिंढे यांच्या निवड समितीने यंदाच्या मराठी साहित्यकृतीची निवड या पुरस्कारसाठी केली.
