मुंबई, दि. 5 जाने (प्रतिनिधी) पुनीत खांडेकर- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई.शाखा तालुका तळा मुंबई /ग्रामिण व संलग्न कुणबी युवा मुंबई /ग्रामिण यांच्या माध्यमातून समस्त कुणबी समाज जोडण्यासाठी एक विशेष अभियान राबवले जात आहे. सदर अभियान ८ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान संपूर्ण रायगड जिल्ह्यात होणार असून, १२, जानेवारी २०२३ रोजी तळा तालुक्यामध्ये होणार आहे. नियोजनाची संपूर्ण जबाबदारी ही ग्रामीण शाखा तळा आणि मुंबई शाखा तळा व ग्रामीण कुणबी युवा व मुंबई कुणबी युवा यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.
हक्काधिकारासाठी समस्त कुणबी समाज एकवटला जावा, येणाऱ्या पिढीसाठी एक सक्षम समाज निर्माण व्हावा. समाजाचे प्रलंबीत प्रश्न, समाजातील जनजागृती व्हावी यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई व राजकीय संघटन समिती यांच्या सहकार्याने कुणबी जोडो अभियान संपूर्ण कोकणात आयोजित केला आहे. त्याचा पहीला टप्पा रत्नागिरीत झाला असून दुसरा टप्पा १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान रायगड जिल्ह्यात होत असून, १२ जानेवारी रोजी तळा तालुक्यात होणार आहे. मजगाव पासून या अभियानाला सुरुवात करून म्हसळा तळा रोड मांदाड मार्गे रस्त्या लगतची गावे घेत मु.राहाटाड गाव चे सुपुत्र आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबई. चे दानशुर नेते स्व. पांडुरंगशेठ वाघे यांच्या पुण्य स्मृतीला विनम्र अभिवादन करून सदर अभियान रॅली विभाग ३ मधील गाव पिटसई येथील सभागृहात सभेत रूपांतर होईल तेथे मार्गदर्शन होईन नंतर तालुका तळा येथील सभागृहात कुणबी जोडो अभियान होणार असून विभाग ४ मधील गाव कळमशेत येथील सभागृहात सहभोजनचे आयोजन करण्यात आले आहे. विभाग १ येथील निगुडशेत गावी अभियानाची सांगता होणार आहे.आयोजक कुणबी समाजोन्नती संघ मुंबई. शाखा तालुका तळा मुंबई/ग्रामिण व कुणबी युवा मुंबई/ग्रामिण यांच्या अधिपत्याखाली होत असून कार्यक्रम यशस्वी करण्याची संपूर्ण जबाबदारी ही तालुका शाखांवरती सोपवली गेलेली आहे.
