अहमदनगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक २०२३’ ही एकांकिका स्पर्धा सावेडीतील माऊली सभागृहात उत्साहात झाली. यात तरुणाईचा मोठ्या उत्साह व जल्लोष पहायला मिळाला.
यावेळी मुंबईतील महर्षी दयानंद कॉलेजच्या ‘बारम’ या एकांकिकेने प्रथम तर मुंबईच्याच गुरुनानक खालसा स्वयत्त महाविद्यालयाच्या ‘काही तरी अकडलंय’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघाला १ लाख ५१ हजार १११ रुपये आणि उपविजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रुपये पारितोषिक मिळालं.
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून अहमदनगर महाकरंडकचा नावलौकिक आहे. ही स्पर्धा ११ ते १४ जानेवारी दरम्यान अहमदनगर येथील माऊली सभागृहात संपन्न झाली. यंदाचं स्पर्धेचं हे दहावं वर्ष होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातील २७ संघ सहभागी झाले होते. याशिवाय कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांमधील काही कलाकारांनी हजेरी लावत स्पर्धेची शोभा आणखी वाढवली.
अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंदजी फिरोदिया, आमदार संग्राम जगताप, आशाताई फिरोदिया, छायाताई फिरोदिया, अभिनेत्री प्रतीक्षा जाधव, कलर्स मराठी वाहिनीचे बिझनेस हेड विराज राजे, दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
कलर्स मराठी वाहिनीचा सहयोग यंदाच्या अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेला लाभला. दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर आणि अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-
प्रथम क्रमांक – बारम (महर्षी दयानंद कॉलेज, मुंबई)
सर्वोत्कृष्ट विनोदी – नाना थोडं थांबा ना…! (अंतरा प्रॉडक्शन्स, अहमदनगर)
द्वितीय क्रमांक – काहीतरी अकडलंय… (गुरुनानक खालसा स्वायत्त महाविद्यालय, मुंबई)
तृतीय क्रमांक – उकळी (रंगसंगती, ठाणे)
चतुर्थ क्रमांक – लेखकाचा कुत्रा (मिलाप थिएटर्स, पुणे)
उत्तेजनार्थ – जिन्याखालची खोली (कलांश थिएटर्स, मुंबई)
विशेष लक्षवेधी – जंगल जंगल बटा चला है (परिवर्तन कला फाऊंडेशन, कोल्हापुर)
परिक्षक शिफारस – गोदा (माय नाटक कंपनी, पालघर)
अवघडीचे 5 दिवस (ओम आर्टस्, नाशिक)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
प्रथम क्रमांक – यश पवार/ऋषिकेश मोहिते (बारम)
द्वितीय क्रमांक – अमित पाटील (काहीतरी अडकलंय…)
तृतीय क्रमांक – महेश कापरेकर/ सागर चव्हाण (जिन्याखालची खोली)
उत्तेजनार्थ – अनिकेत मोरे (गोदा)
अजय पाटील (डोक्यात गेलंय)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
प्रथम क्रमांक – प्रणव जोशी (लेखकाचा कुत्रा)
द्वितीय क्रमांक – देवेन कोळंबकर/अशोक अनिवसे (बारम)
तृतीय क्रमांक – अजय पाटील (डोक्यात गेलंय)
उत्तेजनार्थ – राघवेंद्र कुलकर्णी (असाही एक कलावंत)
अनिकेत मोरे (गोदा)
महेश कापरेकर (जिन्याखालची खोली)
सह अभिनेता प्रथम – निलेश माने (लेखकाचा कुत्रा)
विनोदी प्रथम क्रमांक – कान्हा तिवारी (नाना थोडं थांबा ना…)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
प्रथम क्रमांक – निकिता घाग (फ्लाईंग राणी)
द्वितीय क्रमांक – डॉ. ज्युईली टेमकर (मेन ईन ब्लॅक)
तृतीय क्रमांक – सानिका देवळेकर (डोक्यात गेलंय)
उत्तेजनार्थ – अमृता आमडोसकर (गोदा)
रोशनी मोढे (जिन्याखालची खोली)
सहअभिनेत्री प्रथम क्रमांक – रश्मी सांगळे (उकळी)
विनोदी अभिनेत्री द्वितीय क्रमांक
विजया गुंडप (आखाडा)
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना
प्रथम क्रमांक – शाम चव्हाण (बारम)
द्वितीय क्रमांक – संकेत पारखे (असाही एक कलावंत)
तृतीय क्रमांक – ओंकार येंडे (गोदा)
सर्वोत्कृष्ट संगीत
प्रथम क्रमांक – श्रीनाथ म्हात्रे आयुष पवार (जिन्याखालची खोली)
द्वितीय क्रमांक – वैभव काळे/मधुरा तरटे (अवघडीचे 5 दिवस)
तृतीय क्रमांक – तृप्ती सोनवणे/प्रणव रांगडे (गोदा)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
प्रथम क्रमांक – निरंजन मगईन/वैष्णवी पेडकर
(जंगल जंगल बटा चला है)
द्वितीय क्रमांक – अवघडीचे 5 दिवस
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
प्रथम क्रमांक – रितीका राजे
(जंगल जंगल बटा चला है)
द्वितीय क्रमांक – अवघडीचे 5 दिवस
सर्वोत्कृष्ट नेपथ्य
प्रथम क्रमांक – विशाल भालेकर (फ्लाईंग राणी)
द्वितीय क्रमांक – दिप्ती साळुंके/विनायक परदेशी (लेखकाचा कुत्रा)
तृतीय क्रमांक
संपूर्ण नाट्यस्पर्श मंडळ (प्रवास)
सर्वोत्कृष्ट लेखन
प्रथम क्रमांक – विशाल कदम (लेखकाचा कुत्रा)
द्वितीय क्रमांक – सिध्देश साळवी (काहीतरी अडकलंय)
तृतीय क्रमांक – चैतन्य सरदेशपांडे (उकळी)
चतुर्थ क्रमांक – अजय पाटील (डोक्यात गेलंय
