मुंबई, दि. 20 जानेवारी(प्रतिनिधी) : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या कुणबी समजाच्या १०२ वर्ष पूर्ण झालेल्या मातृ संस्थेच्या मुख्य कार्यालयात कोणतीही पूर्व परवानगी न घेता, मनसे चे डोंबिवलीचे सचिव गणेश कदम, संतोष नलावडे, निलेश इंदप आणि इतर मनसे कार्यकर्त्यांनी कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे आणि त्यांचे सहकारी सचिन रामाने यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केली. सदर घटनेत सचिन रामाने यांना दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ के ई एम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिम्स काही दिवसा पूर्वी सोशल मिडिया वर वायरल झाली होती. सदर मिम्सचा आधार घेत मनसे डोंबिवली सचिव गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १२/०१/२०२३ रोजी भोईवाडा पोलिसांकडे, माधव कांबळे वर फेसबुक केलेल्या वायरल पोस्ट संशय असून पत्राद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती. दि. १८/०१/२०२३ रोजी रात्री ०९:३० च्या दरम्यान कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या परेल येथील मुख्य कार्यालयात संघटनेच्या कार्यात अडथळा निर्माण करीत गणेश कदम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे यांना अर्वाच भाषेत शिवीगाळ करीत हल्ला करून मारण्याचा प्रयत्न केला. माधव कांबळेना वाचविण्याच्या कुणबी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नात सचिन रामाने या कार्यकर्त्याला जबर मारहाण झाली. या मारहाणीत सचिन रामाने बेशुद्ध झालेले पाहून मनसे सचिव गणेश कदम, संतोष नलावडे, निलेश इंदप आणि सहकारी यांनी पळ काढला.
सदर घटनेची दखल घेत भोईवाडा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत भारतीय दंड संहिता १८६० कलम ४५२, ४४८, ३२४, ३२३, ५००, ५०४, ५०६ अंतर्गत मनसे पदाधिकारी गणेश कदम यांना तात्काळ अटक केली आहे.या घटनेचा कुणबी समाजाने जाहीर निषेध केला आहे.आरोपींवर कारवाई करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शिवश्री सागरराजे भोसले मुंबई प्रदेश अध्यक्ष, शिवश्री नितीन बारस्कर संभाजी ब्रिगेड मुंबई प्रदेश संघटक ,शिवश्री प्रतीक सकपाळ ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष ,शिवश्री विशाल रामाने उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष, शिवश्री संजय येद्रे कलिना विधानसभा अध्यक्ष यांनी पोलिसांना विनंती पत्रक देऊन कारवाईची मागणी करत सदर प्रकरणाचा जाहीर निषेध केला आहे.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ
